Sunday, June 21, 2015

ललित मोदींची भेट घेतल्याची राकेश मारिया यांची माहिती


ललित मोदींची भेट घेतल्याची राकेश मारिया यांची माहिती
मुंबई - आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांची 2014 मध्ये आपण लंडनमध्ये भेट घेतली होती, अशी कबुली आज मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. मारिया यांच्या आजच्या खुलाशामुळे ललित मोदींमुळे निर्माण झालेल्या वादात भर पडली आहे. अंडरवर्ल्डकडून ललित मोदी यांना धमक्‍या येत असल्यामुळे त्यांनी मुंबई पोलिसांची मदत मागितली होती, असे मारिया यांनी सांगितले. 

ललित मोदी यांच्या वकिलांच्या विनंतीवरून लंडनमध्ये 2014 मध्ये आपण ललित मोदींना भेटलो होतो; तसेच या भेटीची आपण गृहमंत्र्यांना माहिती दिली होती, असेही मारिया यांनी स्पष्ट केले. मारिया आणि ललित मोदींचे एक छायाचित्र आज एका वृत्तवाहिनीवर झळकले होते, त्यानंतर मारिया यांनी वरील खुलासा केला आहे. लंडनमध्ये मुंबई पोलिस कुठलीही मदत करू शकत नाहीत, मोदींनी भारतात परतावे आणि तक्रार दाखल करावी, त्यानंतरच धमक्‍यांप्रकरणी मुंबई पोलिस मदत करू शकतील, असे आपण मोदींना सांगितल्याचे मारिया यांनी म्हटले आहे.

No comments: