Sunday, June 28, 2015

   
Gajanan Sirsat
June 28 at 1:31am
 
माझ्या सर्व आंबेडकरवादी बहुजन भावांनो आणि बहिनींनो आपनास ईंडियन सोश्यालिष्ट रिपब्लिकन असोशिएशन कडुन तसेच सम्यक मानवसेवा केंद्रा कडुन सप्रेम जयभिम...जयशिवराय...नमोबुद्धाय. 
भावांनो काही दिवसापासुन आंबेडकरवादी बहुजन चळवळ fb व whtasapp च्या रुपाने फोपावत आहे. 
आपले जास्तित जास्त तरुन तरुनि लिहायला लागले आहेत , बाबासाहेबांच्या साहीत्याबद्दल वाचन वाढले आहे तसेच सर्व बहुजन नेत्यांचे साहीत्य वाचुन त्याचा fb व whatsapp माध्यमातुन प्रचार होत आहे. 
हि खुपच आनंदाची बाब आहे. 

पन हे सर्व कार्य करता करता आपले चळवळीचे कार्यकर्ते कुठेतरी भरकटल्या सारखे वागु लागले आहेत 
थोड्याफार प्रमानात आंबेडकरवादी चळवळीचा गाभा ,मतितार्थ विसरु लागले आहेत, असे वाटु लागले आहे. 

हे सर्व लिहायचे कारन की आंबेडकरवादी बहुजनांची चळवळ ही समाजकेंद्रीत चळवळ आहे, व्यक्तिकेंद्रीत नाही , हाच मतितार्थ आम्हि विसरत चाललो आहोत. 

कारन आजकाल आपन चळवळीबद्दल एखादा लेख किंवा त्यावर एखादी प्रतिक्रीया देतो , आणि नेमका त्या लेखाला किंवा त्यवरिल प्रतिक्रीयेला कुनी एखाद्या जातीयवादी प्रवुत्तीच्या व्यक्तीने आव्हान दिले किंवा ऊलट प्रतिक्रीया दिली , कि लगेच आम्हि हि आपल्या भावा बहिनींना त्या पोस्ट वर बोलावुन त्याला नमवायचे प्रयत्न करतो आनि तेही मग कुठल्याही भाषेत. 
आणि हे ईतके दिवस चालु राहते की आपन जातीयवाद्यांच्या जाळ्यात आपोआप अडकतो, मग त्यांचे फोन कॉलस , पोलीस कार्यवाही यांना तोंड देता देता शेवटी काही दिवस आपले लिखान थांबवतो किंवा आपली ID बदलवुन टाकतो. 

परंतु मि माझ्या बांधवाना सांगु ईच्छितो की आपन जे काही चळवळीबद्दल लीहीतो ते आपल्याच बहुजन समाजासाठी लिहीतो , कुन्या एखाद्या किंवा काही जातीयवादी व्यक्तींसाठी नव्हे , त्यामुळे त्या काही व्यक्तींनी विरोध जरी केला तर त्यांना सैंविधानीक भाषेत पुराव्यासहीत समजावुन सांगन्याचा प्रयत्न करा , आणि समजतच नसेल शिविराळ भाषेवर ऊतरत असेल तर अश्यांना block करा किंवा unfriend करा. 
व पुढे चला. 
कारन चळवळ अजुन खुप पुढे न्यायची आहे , सर्व बहुजन समाज आंबेडकरवादी व बहुजन नेत्यांच्या विचारांसोबत जोडायचा आहे , 
आणि हे काम आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनाच करायचे आहे , हे लक्षात ठेवा. 

म्हनुन एखाद्या किंवा काही जातीयवाद्यांना महत्व न देता , आपल्या कार्यकर्त्यानी अशांना दुर्लक्षित करावे व जे बहुजन आंबेडकरवादी विचांरासोबत येवु ईच्छितात त्यांना सोबत घेवुन चळवळ पुढे न्यावि. 

एवढे करुनहि काहि जात्यंध मुद्दामहुन तुमच्या मार्गात अडथडा आनत असतिल तर ईंडियन सोश्यालिष्ट रिपब्लिकन असोशिएशन आपल्या पाठीसी खंबिरपने ऊभी असेल , याची मी आपनास ग्वॉही देतो. 
एवढेच नव्हे तर जातीयवाद्यांना जशास तसे ऊत्तर देन्यास आम्हि सक्षम असु. 
आपन आपले चळवळीतले योगदान कायम ठेवा. 

" आंबेडकरवादी बहुजन चळवळ व्यक्तिकेंद्रीत नव्हे तर समाजकेंद्रीत बनवा". 

आम्हि आपल्या सोबत नेहमिच असु. 

जयभिम....जयशिवराय...नमोबुद्धाय. 

आपलाच भाऊ 

गजानन सिरसाट (भाऊ) 
रा .अध्यक्ष : ईंडियन सोश्यालिष्ट रिपब्लिकन असोशिएशन. 
व. 
धम्मसेवक : सम्यक मानवसेवा केंद्र.

No comments: